'अलीबाबा'ला दणका देत टाटा खरेदी करणार 'बिगबास्केट'

02 Dec 2020 18:50:44
TATA_1  H x W:
 



नवी दिल्ली : ऑनलाईन ग्रॉसरी कंपनी बिगबास्केटमधील तब्बल ८० टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील चर्चा अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. ही भागीदारी १.३ दशलक्ष डॉलर्स म्हणजे ९.५७ हजार कोटी रुपये इतकी आहे. देशातील सर्वात मोठ्या ग्रोसरी कंपनी असलेल्या बिग बास्केटचे बाजारमूल्य १.६ दशलक्ष डॉलर्स (११.७८ हजार कोटी) इतके आहे.
 
 
 
'अलीबाबा'ची हिस्सेदारी अधिक
 
 
गेल्या पाच महिन्यांपासून टाटा आणि बिगबास्केटमध्ये चर्चा सुरू आहे. त्यानुसार या व्यवहारावर सहमती झाली आहे. टाटा ग्रुपचे सहकारी गुंतवणूकदार ५० ते ६० टक्क्यांची हिस्सेदारी खरेदी करू शकतात. चीनी गुंतवणूकदार अलीबाबा आणि रिटेल कंपन्यांची प्रमुख गुंतवणकू आहे.
 
 
 
बिगबास्केटमध्ये अलीबाबाची २९ टक्के हिस्सेदारी आहे. 'अलीबाबा' कंपनीला ही गुंतवणूक विकायची आहे. दुसऱ्या बड्या गुंतवणूकदारांमध्ये अबराज ग्रुप (१६ ३ टक्के), अॅसेंट कॅपिटल (८.६ टक्के), हेलियॉन वेंचर पार्टनर्स (७%), बेसेम्मर वेंचर पार्टनर्स (६.२%), मिराए एस्सेट नवर एशिया (५%), इंटनरेशनल फाइनेंस कॉर्पोरेशन (४.१%), सैंड्स कैपिटल (४%) आणि सी ग्रुप (३.५%) आदींचा सामावेश आहे.
 
 
अॅमेझॉन आणि रिलायन्सला आव्हान
 
 
एका अहवालानुसार, टाटा ग्रुप या करारानंतर भारतीय ई-कॉमर्स क्षेत्रात आपली पाळेमुळे घट्ट रोवू इच्छीत आहे. त्यात 'बिगबास्केट'चा मोठा वाटा असणार आहे. तसेच टाटा समुह आपले सुपर अॅप लवकरच घोषित करणार आहे. बिगबास्केटला घरगुती वस्तू आणि अन्य उत्पादनांच्या खरेदीसाठी चांगला प्रतिसाद मिळू शकतो. त्याची स्पर्धा रिलायन्स जिओ मार्ट आणि अॅमेझॉनशी असणार आहे. टाटा सन्सच्या वार्षिक बैठकीत अध्यक्ष एन.चंद्रशेखरन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुपर अॅप अंतर्गत खाद्यपदार्थ, ग्रॉसरी, फॅशन, इलेक्ट्रॉनिक, विमा, वित्तीय सेवा, शिक्षण, आरोग्य आणि बिल बेमेंट आदी सेवा उपलब्ध होणार आहेत.


Powered By Sangraha 9.0