दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे आ. किसन कथोरे यांच्या हस्ते प्रकाशन

19 Dec 2020 17:47:08

Badlapur_1  H x
 
 
बदलापूर : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन भाजप ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते शनिवार १९ डिसेंबर रोजी बदलापूर येथील त्यांच्या कार्यालयात करण्यात आले. यावेळी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक राजेश पाटील, जीवनदीप शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र घोडविंदे तसेच ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी सुधीर लवांडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर आ.किसन कथोरे यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0