नेहा कक्करच्या गरोदर असण्याच्या पोस्टची पोलखोल

19 Dec 2020 17:23:00
neha kakkar_1  





नेहाचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर चिडले

मुंबई: बॉलिवूड गायिका नेहा कक्करने गरोदरपणातला फोटो समाजमाध्यमांवर पती रोहनप्रीतसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर दोघांनावरही शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. या फोटोसोबत नेहाने, ‘ख्याल रखया कर’ असे कॅप्शन दिले होते. त्यामुळे नेहा आणि रोहनप्रीतच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे अशी चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाली होती. मात्र आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. नेहानं आता तिच्या आगामी गाण्याचं पोस्टर रिलीज केलं आहे. त्यामुळे नेहा गरोदर नसून फोटो शेअर करणे, हे तिच्या ‘ख्याल रखया कर’ या आगामी गाण्याचं प्रमोशन होतते, हे स्पष्ट झाळे आहे. नेहाचे हे गाणे येत्या २२ डिसेंबरला रिलीज होणार आहे.



गाण्याच्या प्रमोशनसाठी नेहाने पुन्हा एकदा चाहत्यांना वेडं केले आहे. तिने तिच्या आगामी गाण्याच्या प्रमोशनसाठी गरोदरपणाच्या बातम्यांचा वापर केला आहे. नेहाने तिच्या आणि रोहनच्या लग्नाआधी असाच पब्लिसिटी स्टंट केला होता. यापूर्वी 'नेहू दा व्याह’ या गाण्यात त्या दोघांचे लग्न दाखवण्यात आले होते. त्यानंतर दोघे खरच लग्नबंधनात अडकले. आणि यामुळेच नेहाचे चाहते पुन्हा एकदा तिच्यावर चिडले आहेत. नेहाच्या या पोस्टवर भाष्य करत ते आपला संताप व्यक्त करत आहेत.

Powered By Sangraha 9.0