दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५ ’चे आ.गणपत गायकवाड यांच्या हस्ते प्रकाशन

18 Dec 2020 19:32:21

Covid yoddha Thane _1&nbs



कल्याण : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १७ डिसेंबर रोजी त्यांच्या कार्यालयात करण्यात आले.
 
यावेळी उल्हासनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र वारे, ठाणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्याम पाटील तसेच ‘दै. मुंबई तरुण भारत’चे प्रतिनिधी सुधीर लवांडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर आ.गणपत गायकवाड यांनी या सर्व ‘कोविड योद्ध्यां’चे तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.



Powered By Sangraha 9.0