नाशिककरांना लवकरच शुद्ध व स्वच्छ पाणी : महापौर सतीश कुलकर्णी

    दिनांक  18-Dec-2020 12:25:19
|

satish kulkarni_1 &n

अळ्यामिश्रित पाणी येत असल्याबाबत नागरिकांनी केली होती तक्रारनाशिक: नाशिक रोड विभागातील नागरिकांना पिण्याचे पाणी हे दारणा नदीतील ‘रॉ वॉटर चेहेडी पम्पिंग स्टेशन’ येथून उचलून शुद्धीकरण करून पिण्याकरिता पुरविले जात आहे. परंतु, त्या साचलेल्या पाण्यात अळ्या तयार होऊन पाणी उचलण्याच्या ठिकाणापर्यंत येत आहेत व तेच शुद्धीकरण करून नाशिक रोडवासीयांना पिण्याकरिता पुरविण्यात येत आहे. त्यामुळे अळ्यामिश्रित पाणी येत असल्याबाबत नाशिक रोड प्रभागातील नगरसेवकांनी बर्‍याच वेळा महासभेत प्रश्न उपस्थित करून नाशिक रोडवासीयांना शुद्ध पाणी मिळावे, याकरिता आग्रही भूमिका घेतली.

महापौर सतीश कुलकर्णी यांनी दि. ४ नोव्हेंबर रोजी सभागृहनेते सतीश बापू सोनवणे यांच्यासह नाशिक रोडमधील सदस्यांसमवेत ‘चेहेडी पम्पिंग’चा पाहणी दौरा केला होता. नंतर प्रशासनासमवेत झालेल्या चर्चेत सर्वात प्रथम गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिक रोड येथील जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान ८०० मिमी व ६०० मिमी व्यासाची पीएससी जलवाहिनी २००१ साली टाकण्यात आली होती. तिला आज २० वर्षे होत आहेत. त्यामुळे बर्‍याच ठिकाणी लिकेज होणे, वाहिनी फुटणे यांसारखे प्रश्न उपस्थित होऊन पाणीपुरवठ्याला अडचण येतो. त्याकरिता पुढील 30 वर्षांचे नियोजन गृहित धरून सदर पाणीपुरवठा वाहिनीचा अभ्यास करून सल्लागारांमार्फत प्रस्ताव ठेवण्यासाठी महापौर यांनी आदेशित केले.

nashik_1  H x W

याबाबत तांत्रिक सल्लागार संचालक ‘वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, मुंबई’ यांनी अभ्यास करून अहवाल सादर केला. त्यांनी गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्रपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी टाकणे आवश्यक असून ते काम हाती घेण्याबाबत सूचित केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.