‘आसीसीआर’च्या अध्यक्षपदी डॉ.विनय सहस्रबुद्धे यांची फेरनिवड

17 Dec 2020 21:51:56

Vinay Sahastrabuddhe_1&nb
 
 
नवी दिल्ली : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदी भाजपचे राज्यसभा सदस्य डॉ. विनय सहस्रबुद्धे यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते अध्यक्षपदी कार्यरत असणार आहेत. पुढील भारताची ‘सॉफ्टपॉवर’ प्रस्थापित करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. सहस्रबुद्धे यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली.
 
 
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद भारताची सांस्कृतिक शक्ती आणि वैशिष्ट्ये जगासमोर मांडण्यासाठी कार्यरत आहे. त्यामध्ये जगातील सर्व देशांसोबत सांस्कृतिक संबंध बळकट करण्यावरदेखील भर देण्यात येतो. यापूर्वी आपल्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी ‘आयसीसीआर’द्वारे बदलत्या भारताची भूमिका जगासमोर मांडण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. सहस्रबुद्धे यांची ‘आयसीसीआर’ अध्यक्षपदी फेरनिवड केली आहे.
 
 
‘अंडरस्टॅण्डिंग इंडिया’ हे पुढचे ध्येय बदलत्या काळात संपूर्ण जगात ‘सॉफ्टपॉवर’चे म्हणजेच सौम्यसंपदेचे महत्त्व अधिकाधिक वाढत जाणार आहे. भारताकडे सौम्यसंपदा फार मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, त्याचा उपयोग जगाची भारताविषयीची धारणा आणि आकलन प्रस्थापित होण्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये ‘अंडरस्टॅण्डिंग इंडिया’ या संकल्पनेवर ‘आयसीसीआर’ काम करणार आहे.



Powered By Sangraha 9.0