ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून जादूटोणा

17 Dec 2020 14:09:41
eknath shinde_1 &nbs




दोन नराधमांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली

ठाणे: अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात आणि याच प्रथेचा प्रयोग तब्बल ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून अटक केली आहे.


विक्रमगड तालुक्यातील व जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने हा जादूटोणा करण्यात आला. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा अथवा त्यांच्या शरीराला जीवघेण्या जखमा होवून दुखापत करण्याकरिता काही अनिष्ठ अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. शिंदे यांच्या फोटो समोर अगरबत्ती पेटवून हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू , सफेद कोंबडा यांचा वापर करून अघोरी जादूटोणा करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे




महाराष्ट्र राज्यातील अघोरी जादूटोणा, नरबळीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने नरबळी आणि अमानुष, अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व समुळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अमलात आणला. मात्र अजूनही या अघोरी जादूटोणा नरबळी प्रथा केल्या जातात.



Powered By Sangraha 9.0