माझा मानसिक छळ होतो ; पाक खेळाडूची व्यथा

17 Dec 2020 19:28:49

Amir_1  H x W:
 
नवी दिल्ली : पाकिस्तान संघ आणि अंतर्गत वाद हे काही क्रीडा विश्वाला नविन नाहीत. काही काही महिन्यांआधी दानिश कनेरियाचा वाद समोर आल्यानंतर पाकिस्तान संघ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर सडकून टीका झाली. आता आणखी एक वाद समोर आला असून, पाकिस्तानी तेज गोलंदाज मोहम्मद आमिरच्या वक्तव्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ''येथे माझा मानसिक छळ होत असून हे आता सहन होत नाही." असे वक्तव्य त्याने केले आहे. यासंदर्भातील त्याची मुलखात सध्या वायरल होत आहे.
 
 
 
आमिरने कसोटीमधून याआधी निर्वृत्ती घेतली असून आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून अनिश्चित काळासाठी विश्रांती घेतली आहे. तो विदेशातील विविध लीगमध्ये खेळत राहणार आहे. मात्र, पाकिस्तान संघासाठी तो अनिश्चित काळासाठी उपलब्ध राहणार नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने म्हंटले आहे की, "पाक संघामध्ये माझा मानसिक छळ होत आहे. आता हे सहन होत नाही. सध्याच्या परिस्थितीत मी पाकिस्तान संघाकडून किक्रिटे खेळू शकत नाही, दोन ते तीन दिवसांमध्ये पाकिस्तानमध्ये गेल्यानंतर बोर्डाशी याबाबत चर्चा करणार आहे."
 
 
 
मोहम्मद अमीर हा सध्या श्रीलंका प्रीमियर लीगमध्ये खेळत आहे. यावेळी त्यांनी मुलाखतीमध्ये म्हंटले की, "मी क्रिकेटपासून दूर जात नाही. पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे व्यवस्थापन मला क्रिकेटपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझा मानसिक छळ केला जातो आहे. २०१० ते २०१५ यादरम्यान मानसिक छळही सोसले आहेत. यादरम्यान मला क्रिकेटपासून दूरही जावे लागले. आता हे सहन होत नाही."
 
 
Powered By Sangraha 9.0