भाजपा नगरसेविका मनिषा धात्रक यांनी प्रभागात उभारली शिल्पे

17 Dec 2020 19:25:22

online education _1  
 
 
 
 
 

डोंबिवली : आपल्या देशात युवापिढी जास्त आहे. या पिढीने चांगले शिक्षण द्यावे असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर बोलत असे. युवापिढी शिकली तर देशाची प्रगती होते. हेच शैक्षणिक महत्त्व लक्षात घेऊन आणि मुलांना अभ्यास करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी भाजपा नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक यांनी प्रभागात नामनिर्देशित फलाकांसह सौंदर्यपूर्ण शिल्पे उभारली आहेत. या शिल्पामुळे प्रभागाला नवीन लूक मिळाला असून ही शिल्पे वाटसरूचे लक्ष वेधून घेत आहेत.
 
 
 
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका विभागातील गणोश मंदिर एलोरा सोसायटी प्रभाग क्रमांक 60 मधील भाजपा नगरसेविका मनिषा शैलेश धात्रक यांनी प्रभागात दोन ठिकाणी नामनिर्देशित फलाकांसह सौंदर्यपूर्ण शिल्पे उभारली आहेत. या नामनिर्देशीत फलकांचा शुभारंभ नगरसेवक शैलेश धात्रक, अतुल नाईक, अंजू नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. मनिषा धात्रक, राजू सिंग, किशोर पाटील, केतन संघानी, सचिन सावंत, सूरज गुप्ता, गजेंद्र धात्रक, सुचिता धात्रक, नमिता कीर, प्राची शेलेकर, दिव्या परब, मनाली कदम यांच्यासह प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
 
 
मनिषा धात्रक यांनी प्रभागातील नागरी समस्या आणि मूलभूत गरजा लक्षपूर्वक सोडविण्यावर भर देऊन प्रभागाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या प्रभागाची अनधिकृत फेरीवालामुक्त प्रभाग म्हणून गणना होत आहे. आता धात्रक यांनी पंडीत दीनदयाळ मार्गावरील जुने पोस्ट कार्यालयाजवळ नामनिर्देशित फलकांसह शिल्प उभारले आहे. ज्या ठिकाणी शिल्प उभारले आहे त्या जंक्शनला स्व. सौ. चित्र सुधाकर नाईक पदपथ असे नामकरण करण्यात आले आहे.
 
 
 
या ठिकाणी आनंदी माणसाचे शिल्प उभारले आहे. डोंबिवलीतील प्रसिध्द चित्रकार सुधाकर नाईक याच प्रभागात राहत होते. त्यांच्या स्वर्गीय पत्नीचे नाव पदपथास दिल्यामुळे प्रभागातील नागरिकांची ही मागणी पूर्ण झाली आहे. दैवीचौक क्रॉसरोड येथील पदपथावर पृथ्वीच्या गोलाकार प्रतिमेवर पुस्तक वाचत असलेला मुलगा आणि लॅपटॉपवर काम करणारी मुलगी अशा शैक्षणिक विषयावर लक्ष केंद्रीत करणारे शिल्प प्रभागाच्या सौदर्यात भर पाडत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0