'थपडेवर थप्पड… शिवसेनाला आणखी एक धक्का'

17 Dec 2020 14:03:27
 
Shvsena_1  H x
मुंबई : कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या राज्य सरकारच्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केल्या. त्यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती १८ गावे आता महापालिकेतच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. इतकेच नाही तर महापालिका निवडणुकीतही या गावांचा समावेश होण्याची चिन्हे आहेत.
 
 
 
 
 
 
“शिवसेनाला मोठा धक्का, ‘ती’ १८ गावे पालिकेतच. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्द केल्या. थपडेवर थप्पड… थपडेवर थप्पड…” असे ट्वीट करुन भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0