टीम इंडियाची जबाबदारी नवख्या खेळाडूंवर !

    दिनांक  16-Dec-2020 16:59:09
|

Team India_1  H
 
नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघापुढे आता कसोटी मालिकेची मोठी परीक्षा असणार आहे. एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर आणि टी - २० मालिका जिंकल्यानंतर आता कसोटी मालिका विजयाचे लक्ष भारतीय संघासमोर आहे. यासाठी तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा अनोखा ताळमेळ साधण्याचा प्रयत्न व्यवस्थापनाने केला आहे. 'बॉर्डर- गावस्कर' चषक कसोटी मालिकेसाठी अंतिम ११ खेळाडूंचा संघ घोषित करण्यात आला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १७ डिसेंबरपासून चार कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. पहिला सामना अ‌ॅडलेडवर दिवसरात्र खेळवण्यात येणार आहे.
 
रोहित येणार, विराट जाणार
 
भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला असून दुसऱ्या कसोटी सामन्यापर्यंत त्याचे विलगीकरण संपणार आहे. त्यामुळे त्याचा समावेश अंतिम ११मध्ये होणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. यापूर्वी जाहीर केलेल्या २ कसोटी संभाव्य संघामध्ये रोहितचा समावेश करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता त्याच्या ऑस्ट्रेलियामध्ये आगमन झाल्याने त्याचा संघात समावेश होणार असल्याची चर्चा आहे. तसेच, दुसऱ्या कसोटीनंतर विराट कोहली हा भारतात परतणार आहे. त्यामुळे कसोटी संघाचे कर्णधारपद उपकर्णधार अजिंक्य रहाणेला मिळणार की रोहित शर्मा ही जबाबदारी पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 
पहिल्या सामन्यासाठी असा असेल भारतीय संघ
 
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.