राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आक्रमक !

14 Dec 2020 11:30:47

maharashtra_1  

दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाला विरोधक आणि सरकारमध्ये घमासान

 
 
 
 
मुंबई : दोन दिवसीय विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून मुंबईमध्ये सुरुवात झाली. यावेळी हे अधिवेशन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन दिवसाचे करण्यात येत आहे. यावरून अधिवेशनाच्या सुरुवातीलाच विरोधक आक्रमक झाले. मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, पुरग्रस्तांना आणि वादळग्रस्तांना मदत न देणे इत्यादी विषयांवर भाजपचे नेते आक्रमक झाले. महाविकास आघाडी सरकारा धिक्कार असो, अशा घोषणा विरोधी पक्षांनी दिल्या.
 
 
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे ढोल बजाव आंदोलन
 
 
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी, धनगर आरक्षणाच्या मुद्याकडे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात ढोल बांधून सभागृह परिसरात पोहोचले होते. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले असताना गोंधळ झाला. पोलिसांनी त्यांनी पाठीवर लावलेला मागण्यांचा बोर्ड काढत मोडून टाकला. इतर भाजपा नेते पोहोचले असता गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला.
 
 
“हे सरकार झोपले आहे आणि त्यासाठी धनगर समाजाचे श्रद्धास्थान असणारा ढोल वाजवून जागे करण्याचा प्रयत्न केला. माझ्या पाठीमागे १६ मागण्या असणारा बोर्ड लिहिला होता तो मोडला आणि ढोल वाजवण्यापासून रोखले. आमची ही लोककला आहे आणि कारण नसताना पोलिसांनी सरकारच्या सूचनेनुसार रोखले. मी सरकारचा निषेध करतो,” असे पडळकर यावेळी म्हणाले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0