युट्यूब, जीमेल्ससह गुगलच्या सेवा का झाल्या बंद ? वाचा सविस्तर

14 Dec 2020 18:13:23

GMail_1  H x W:
 
 
 
नवी दिल्ली : जगभरातील गूगलच्या सर्व सर्व्हिसेस सोमवारी संध्याकाळी ५.२६ वाजता क्रॅश झाली. यूजरला जी-मेल, यूट्यूबसह गूगलच्या कोणत्याच सर्व्हिसचा वापर करता येत नाही आहे . गूगलने अद्याप यावर कोणतेच स्पष्टीकरण दिले नसले तरीही आम्ही याचा शोध घेत असल्याची माहिती युट्युबने त्वित करत दिली आहे.
 
 
 
 
 
 
एका वृत्तपत्राने सांगितले की, जगभरातील ५४% लोकांना यूट्यूब अॅक्सेस करता येत नाहीये. तसेच, ४२% लोकांना व्हिडिओ पाहता येत नाहीये आणि ३% लोकांना लॉगइन करताना अडचण येत आहे. याशिवाय जीमेलवरही ७५% लोक लॉगइन करु शकत नाही. गूगलचे हँगआउट, गूगल फॉर्म, गूगल क्लाउड, गूगल ड्राइव, गूगल डॉक्सदेखील क्रॅश झाले आहे.



या प्रकारानंतर तासाभरात ही सेवा पूर्ववत करण्यात आली. मात्र, या गोंधळामुळे सोमवारी सकाळी साऱ्यांचीच गैरसोय झाली होती. ट्विटरवर अनेकांनी याबद्दल प्रतिक्रीया दिल्या होत्या. 
 
 
 
Powered By Sangraha 9.0