"२०१४च्या पराभवाला मनमोहन सिंग, सोनिया गांधी जबाबदार"

12 Dec 2020 18:12:04

Pranab Mukherjee_1 &
नवी दिल्ली : माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांच्या 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रातील दाव्याने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रपतीपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसेने राजकीय दिशा गमावली, असा दावा त्यांनी 'द प्रेसिडेंशियल इयर्स' या आत्मचरित्रामध्ये केला आहे. प्रणव मुखर्जी यांनी ३१ ऑगस्ट २०२० ला वयाच्या ८५ व्या निधन झाले. रूपा प्रकाशन द्वारा प्रकाशित त्यांचे 'द प्रेसिडेंशियल इयर्स' हे पुस्तक येत्या वर्षात २०२१मध्ये वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे.
 
 
 
"जर २००४ मध्ये जर मी पंतप्रधान झालो असतो. तर २०१४ मध्ये काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला नसता, असे पक्षातील काही सदस्यांचे मत होते. मात्र, मी या मताशी जास्त सहमत नाही. मला असे वाटते की, मी राष्ट्रपती झाल्यानंतर पक्षाने आपली राजकीय दिशा गमावली. सोनिया गांधी पक्ष सांभाळण्यास असमर्थ ठरल्या." असे प्रणव मुखर्जी यांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हंटले आहे.
 
 
देशाची संपूर्ण व्यवस्था पंतप्रधान आणि प्रशासनाच्या कामकाजाचे प्रतिबिंब असते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग गठबंधन टिकवण्यात मग्न राहिले. त्याचा परिणाम प्रशासनावर झाला. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पहिल्याच कार्यकाळात प्रशासनाची शैलीचा स्वीकार केल्याचे दिसून आले, असं त्यांनी आपल्या पुस्तकामध्ये सांगितले आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील एका गावापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतच्या आपल्या प्रवासावर प्रकाश टाकला आहे.
 
Powered By Sangraha 9.0