‘दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते प्रकाशन

12 Dec 2020 17:20:21

Ramsheth Thakur_1 &n
 
 
 
मुंबई : ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी, दि. १२ डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.
 
 
 
यावेळी ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रमुख रविराज बावडेकर, पत्रकार सय्यद अकबर आणि भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे उपस्थित होते. प्रकाशनानंतर रामशेठ ठाकूर यांनी या सर्व ‘कोविड’ योद्ध्यांचे, तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0