‘दै. मुंबई तरुण भारत’च्या ‘कोविड योद्धा १२५’चे प्रवीण दरेकरांच्या हस्ते प्रकाशन

12 Dec 2020 16:03:42

pravin 1_1  H x





अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचे केले कौतुक

मुंबई: ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या बहुचर्चित ‘कोविड योद्धा १२५’ या विशेषांकाचे प्रकाशन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या हस्ते नुकतेच फोर्ट येथील मुंबई बँकेच्या मुख्य कार्यालयात करण्यात आले.
 
 
 
 
 
pravin_1  H x W



 
 
यावेळी भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष आणि मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, तसेच रायगड सहकारी बँकेचे संचालक नितीन धो. बनकर आणि ‘दै. मुंबई तरुण भारत’चे व्यवसाय प्रतिनिधी रवींद्र जाधव उपस्थित होते. प्रकाशनानंतर प्रवीण दरेकर यांनी या सर्व कोविड योद्ध्यांचे, तसेच हा अंक साकारणार्‍या ‘दै. मुंबई तरुण भारत’च्या टीमचेही कौतुक केले.

 
Powered By Sangraha 9.0