'मुंबई तरुण भारत'च्या 'कोविड योद्धा १२५'चे नितीन गडकरींच्या हस्ते प्रकाशन

11 Dec 2020 12:22:27



 

नागपूर : दै. 'मुंबई तरुण भारत'च्या बहुचर्चित 'कोविड योद्धा १२५' या विशेषांकाचे प्रकाशन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री आणि सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीनजी गडकरी यांच्याहस्ते त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी करण्यात आले.



  
यावेळी विवेक समुहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर, दै. 'मुंबई तरुण भारत'चे बिझनेस हेड रविराज बावडेकर, भाजप प्रदेश उद्योग आघाडीचे प्रमुख प्रदीप पेशकार, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रकाशनानंतर नितीन गडकरी यांनी या सर्व कोविड योद्ध्यांचे तसेच हा अंक साकारणाऱ्या 'मुंबई तरुण भारत'च्या टीमचेही कौतूक केले.




 
 
 
Powered By Sangraha 9.0