प्रख्यात संगीतकार नरेंद्र भिडे यांचे निधन

10 Dec 2020 12:40:15


bhide_1  H x W:




वयाच्या ४७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास



मुंबई: पाऊलवाट, देऊळबंद यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी संगीत देणाऱ्या संगीतकार नरेंद्र भिडे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ४७ वर्षांचे होते. भिडे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी कर्वेनगर येथे सकाळी ९ वाजता त्यांच्या डॉन स्टुडीओमध्ये ठेवण्यात येणार आहे.
 
 
 
भिडे हे सिव्हिल इंजिनियर होते; परंतु त्यांचा ओढ कायमच संगीत क्षेत्राकडे होता. मुळशी पॅटर्न, एलिझाबेथ एकादशी, रमा माधव, देऊळ बंद, हरिशचंद्राची फॅक्टरी यांसारख्या अनेक प्रसिद्ध चित्रपटांना नरेंद्र भिडे यांनी संगीत दिले आहे. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांना संगीत दिलेल्या नरेंद्र भिडे यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.
 
 
आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ हा त्यांचा अखेरचा संगीतबद्ध केलेला चित्रपट ठरला. विविध मराठी नाटकं, चित्रपट, मालिकांची शीर्षकगीते, जाहिरातींच्या जिंगल्स संगीतबद्ध करत त्यांनी कायमच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.



Powered By Sangraha 9.0