मृत गव्याला पुणेकरांनी वाहिली अनोखी श्रद्धांजली

10 Dec 2020 18:21:22
gaur_1  H x W:

रानगव्याचा झाला होता मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी) - कोथरुडमध्ये बुधवारी झालेल्या रानगव्याचा थरार सगळ्यांनीच पाहिला. गव्याला पकडल्यानंतर काही तासांमध्ये त्याचा मृत्यू झाला. या शोकामध्ये पुणेकरांनी चक्क गव्याचा पुतळा उभारून श्रद्धांजली वाहिली आहे. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्या दुकानाबाहेर हा पुतळा उभारण्यात आला आहे. 
 
 
 
कोथरुडमधील महात्मा काॅलनीमध्ये बुधवारी रानगवा शिरला होता. सहा तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागाने या गव्याला पकडले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणावरुन सोशल मिडायावर पुणेकरांवर बरेच मिम्स व्हायरल झाले. अनेकांनी या गव्याच्या मृत्यूचे दुख: व्यक्त केले. मात्र, पुणेकरांनी आज भन्नाट कल्पना लढवून या गव्याला श्रद्धांजली दिली. पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्या दुकानातील गव्याचा पुतळा उभारुन त्याला हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्याठिकाणी लावलेल्या पोस्टरवर "आम्हाला माफ कर, आम्ही तुझे गुन्हेगार" असे लिहण्यात आले होते. 

Powered By Sangraha 9.0