कर्तव्यप्रिय समाजसेवी नेता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

jagdish patil_1 &nbs

नाशिक प्रशासनासमोर कोरोनाचा फैलाव रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान झोपडपट्टी व दाटीवाटीच्या भागांमध्ये होते. अशातच या भागात मोठ्या संख्येने गरीब, मजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने या नागरिकांसमोर आरोग्याबरोबरच रोजच्या जगण्याचेही गंभीर प्रश्न या काळात उभे राहिले. अशावेळी नागरिक व प्रशासनाला मदतीचा हात देणार्‍या भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांचा कोरोनालढ्यातील योगदानाचा घेतलेला आढावा...

जगदीश चिंतामण पाटील
राजकीय पक्ष : भाजप
पद : गटनेता तथा नगरसेवक
प्रभाग क्र. : ४, नाशिक मनपा
संपर्क क्र. : ९८२२००९५४६
 

 

नाशिक शहरातील प्रशासनासमोर कोरोना साथीचा फैलाव रोखण्याचे सर्वात मोठे आव्हान झोपडपट्टी व दाटीवाटीच्या भागांमध्ये होते. या भागात मोठ्या संख्येने गरीब, मजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास असल्याने या नागरिकांसमोर आरोग्याबरोबरच रोजच्या जगण्याचेही गंभीर प्रश्न या काळात उभे राहिले. या कठीण प्रसंगी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत भाजप गटनेता तथा नगरसेवक जगदीश पाटील यांनी मोलाची कामगिरी बजावली. सुरुवातील पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सोबतीला घेऊन नागरिकांमध्ये कोरोनाबद्दल जनजागृती केली. पाटील यांचा ८० टक्के प्रभाग हा झोपडपट्ट्यांचा. छोट्या खोल्या, कुटुंबातील अनेक सदस्य, त्यातच रोजगार ठप्प असल्याने या नागरिकांची एकवेळच्या जेवणाचीही सोय नव्हती. ही परिस्थिती लक्षात घेता, पाटील यांनी एक मंगलकार्यालय भाडेतत्वावर घेत आपल्या पत्नी व मुलांच्या मदतीने जवळपास एक महिना दिवसातून दोनवेळेस गरजूंना शिजविलेले अन्नवाटप करण्यास सुरुवात केली. १ हजार कुटुंबीयांना घरपोच अन्नधान्याची पाकिटे पाटील यांच्या पुढाकाराने वाटण्यात आली.
 
 

 

केंद्रीय आयुष मंत्रालय व आयसीएमआरने सांगितल्याप्रमाणे, नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, या उद्देशाने ’आर्सेनिक अल्बम-30’ या गोळ्यांचे महापौरांच्या हस्ते नाशिकमध्ये सर्वप्रथम वाटप पाटील यांनीच केले. पाटील यांचा प्रभाग नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती व दाट लोकवस्तीचा असल्याने कोरोनाचा विस्फोट होण्याआधीच खबरदारी घेत, पाटील यांनी रा. स्व. संघाच्या बैठकीत धारावीच्या धर्तीवर तपासण्या करण्याची विनंती केली. ही विनंती रा. स्व. संघाच्या बैठकीत मान्य झाली. संपूर्ण पंचवटी परिसरात घरोघरी स्क्रीनिंग करण्याचे कार्य रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी हाती घेतले. तब्बल १०० स्वयंसेवकांनी संपूर्ण पंचवटीतील झोपडपट्टी परिसर पिंजून काढला. या काळात २५ हजार नागरिकांचे स्क्रीनिंग करण्यात आले. स्क्रीनिंगमध्ये जे रुग्ण आढळून आले, त्यांना तत्काळ रुग्णालयात उपचार मिळावे, याची व्यवस्था पाटील यांनी केली. नाशिक महानगरपालिकेच्या सूचनेनुसारदेखील पाटील यांनी ’स्क्रीनिंग कॅम्प’ व ’अ‍ॅन्टिजेन टेस्ट’ आयोजित केल्या. यामध्ये १० दिवस अ‍ॅन्टिजेन टेस्ट करण्यासाठी पाटील यांनी प्रभागात ३ गाड्यांची व्यवस्था केली. यामध्ये २० हजार नागरिकांच्या रॅपिड अ‍ॅन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. अ‍ॅन्टिजेन चाचण्यांसाठी डॉ. बाफना व त्यांच्या सहकारी महिला डॉक्टर यांनीदेखील महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

 
 

नाशिक शहरातील पंचवटी विभागातील प्रभाग क्र.४ मधील वज्रेश्वरी नगर, फुले नगर, विजय चौक, राहुल वाडी, भराड वाडी, सम्राट नगर, वाघाडी, वाल्मिक नगर या भागात जगदीश पाटील यांनी आपले मदतकार्य पोहोचविले. नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांनी व पोलीस प्रशासनाने पाटील यांना या मदतकार्यात उत्तम साथ दिली. एखादा प्रभाग सील झाल्यास त्या भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी पाटील यांनी महापालिका व पोलीस प्रशासनाच्या मदतीने पार पडली. नगरसेवक हेमंत शेट्टी, शंकर हिरे, बाबा शेख, अजर कौर, सरिताताई सोनावणे, किरण सोनावणे, गणेश पिंगळे, सुनील गोरे या सहकार्‍यांसह अनेक कार्यकर्ते, तसेच प्रभागातील कुटुंबीय व लहान मुलंदेखील कोरोनाच्या का मदतकार्यात पाटील यांच्याबरोबरीने उतरले होते. अन्नधान्याच्या वाटपाचे किट पँकिंग करण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांनी हिरीरीने सहभाग नोंदविला. पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील, मुलगी सलोनी व मुलगा हर्षवर्धन पाटील या सर्वांनी रात्रंदिवस मदतकार्यात पाटील यांना खंबीर साथ दिली.

 
 
jagdish patil_1 &nbs
 
मी बालपणापासूनच संघाच्या शाखेत जात असल्याकारणाने माझ्यावर संस्कार होत गेले. आजही गरीब कुटुंबातील अनेकांना महागडे उपचार घेणे शक्य नसते. अशांसाठी माझी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. आम्ही या नागरिकांना वेगवेगळ्या योजनांतून उपचार मिळवून देण्यात मदत करतो. विधवा महिलांच्या मुलांना व अनाथ बालकांना मी दत्तक घेणार आहे. भविष्यात सामाजिक कार्याची व्याप्ती वाढवणे हेच माझे ध्येय आहे.
 

हे मदतकार्य करत असताना, पाटील यांना अनेक आव्हानांचा सामनादेखील करावा लागला. सुरुवातीला अ‍ॅन्टिजेन चाचण्या करताना, त्या झोपडपट्टी परिसरासह उच्चभ्रू वस्तींमध्येही करणे आवश्यक होते. अशावेळी रुग्ण आढळून आल्यास घरात ‘क्वारंटाईन’ कसे करायचे, यांचे खूप समुपदेशन करावे लागत. अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होत नसतं. महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची व्यवस्था करणे, औषधोपचाराची सोय करणे हे सर्व नगरसेवक या नात्याने पाटील यांना पाहावे लागत. थोडीही गैरसोय झाल्यास नागरिक तत्काळ पाटील यांच्याशी मदतीसाठी संपर्क साधत. काही कोरोना रुग्णांना डिस्चार्जवेळी मोठी बिलं आकारली जात. अशावेळी रुग्णालय आणि पेशंट यांच्यात वाद होत. हे वाद होऊ नये व बिलांवर नियंत्रण राहावे, यासाठी यंत्रणांच्या संपर्कात पाटील होते. पाटील यांच्या प्रभागात कष्टकरी वर्ग मोठ्या संख्येने असल्याने ‘लॉकडाऊन’ वाढत गेल्याने रोजगाराचे प्रश्न निर्माण झाले. रोजंदारीवर काम करणार्‍या अनेक गरजूंनी आर्थिक मदत मागितली. अशावेळी सर्वच कुटुंबीयांना आर्थिक मदत देणे शक्य नव्हते. मात्र, त्यांना जीवनावश्यक सर्व गोष्टींचा पुरवठा करत त्यांची समजूत काढण्याचे मोठे आव्हान पाटील यांनी समर्थपणे पेलले. कोणालाही नाराज न करता, मागेल त्या सर्वांना जमेल तसा जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा पाटील यांनी केला.

 
 

हा काळ सर्वांसाठीच कठीण होता. समोर येणार प्रत्येक दिवस काहीतरी नवीन कठीण प्रसंग घेऊन येणार होता. या काळात पाटील यांना कोरोनामुळे सर्वाधिक धोका होता. गेल्यावर्षीच पाटील यांची मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे इतरांच्या तुलनेत पाटील यांची रोगप्रतिकारक शक्ती ५० टक्केच कार्यरत होती. मात्र, कोरोनाची आपत्ती आणि जनसेवेच्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहत शस्त्रक्रियेनंतर केवळ सहा महिन्यांतच पाटील जनसेवेत दाखल झाले. समाजमाध्यमांतूनही पाटील यांनी कोरोनासंबंधित माहिती वेळोवेळी जनतेपर्यंत पोहोचवली. विशेष कोरोना हेल्पलाईन नंबरवरून २४ तास नागरिकांना महानगरपालिकेचे रुग्णालय, बेडची संख्या याची माहिती दिली जात होती. ई-पाससाठी येणार्‍या अडचणी सोडवत नागरिकांना दिलासा दिला. याचदरम्यान पाटील यांच्या मावशी व काका यांचे लागोपाठ दोन दिवसांच्या अंतराने निधन झाले. हीदेखील सर्वाधिक धक्कादायक दुःखद घटना पाटील कुटुंबात घडली. मात्र, तरीही न डगमगता सर्वांना धीर देत, प्रभागातील जनतेसाठी पाटील यांनी तत्परतेने मदतकार्य सुरूच ठेवले आणि आजतागायत हे कार्य सुरूच आहे. अशा संकटकाळात गरिबांना, गरजूंना आपल्याला शक्य ती मदत नक्की करा, यातून त्या गरजूच्या चेहर्‍यावर येणारे हास्य आपल्याला आत्मिक आनंद देणारे असते, असे जगदीश पाटील सांगतात.

@@AUTHORINFO_V1@@