कोरोना देवदूत

10 Dec 2020 16:01:40

Ramsheth Thakur_1 &n
 
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र आहे. त्यांनी गरजूंच्या मदतीसाठी कधीही राजकारण केले नाही. त्यामुळे गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व ही ठाकूर यांची प्रतिमा जनमानसावर कोरली गेली. जनतेच्या लहानमोठ्या प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देणारे लोकनेते रामशेठ ठाकूर कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...
 

रामशेठ ठाकूर
राजकीय पक्ष : भाजप
पद : माजी खासदार, रायगड लोकसभा मतदारसंघ

 
 
 
लोकांवर आलेले कोणतेही संकट असो ते आपले आहे, असे मानून सढळ हस्ते समाजाचे देणेदार लागतो, या भावनेतून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काम केले. त्यांनी लहानपणापासून खूप काबाडकष्ट केले. कष्टाने आर्थिक सुबत्ता आली असली तरी ते दिवस विसरायचे नाही, हे ध्येय मनात कायम ठेवले. त्यांनी व्यवसायात नफा कमाविला, पण, ते माझे नाही, त्यात समाजाचाही वाटा आहे, असे मानून समाजासाठी मदत करण्याचा प्रयत्न केला. पक्षविरहित काम करणे हा आपला आत्मा असल्यानेच कार्य करण्याची ऊर्जा मिळते. कोरोनाकाळात केलेल्या कार्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत, आदर्श व पितृतुल्य व्यक्तिमत्त्व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्कारानेही सन्मान करण्यात आला.
गेली अनेक वर्षे जनतेच्या लहान-मोठ्या प्रश्नांकडे बारकाईने आणि जातीने लक्ष देणारे लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर या जागतिक संकटातही गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ‘लॉकडाऊन’ पुकारण्यात आल्यानंतर हातावर पोट असलेल्या अनेकांची उपजीविका अडचणीत आली. अशा वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या प्रेरणेने आ. प्रशांत ठाकूर, महापालिका सभागृहनेते परेश ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी ८२ हजारांहून अधिक नागरिकांना अन्नधान्याचे घरपोच वाटप केले. त्याचबरोबरीने मोलमजुरी, तसेच हातावर पोट असलेल्या गरजूंना ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’ या माध्यमातून एक लाख २५ हजारांहून अधिक तयार जेवणाचे वाटप करण्यात आले. या सर्व उपक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन मोलाचे ठरले. याखेरीज ‘आर्सेनिक अल्बम-३०’ गोळ्यांचे वाटप असो वा मास्कचे वाटप, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्यांची कोरोनासंबंधित हर एक गरज भागविण्याचा प्रयत्न अव्याहतपणे सुरू आहे. कुणीही गरजू लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या समोरून रिक्त हस्ते परतत नाही. कोरोनाच्या या अभूतपूर्व संकटकाळातही लोकनेते रामशेठ ठाकूर शक्य तितक्या अधिकाधिक लोकांपर्यंत सर्व प्रकारची मदत पोहोचविण्याचा प्रयास करीत आहेत. लोकनेते रामशेठ ठाकूर हे एखाद्या आधारवडासारखे जनतेच्या पाठीशी उभे आहेत. सध्याच्या कोरोना संकटामुळे आपल्या वाढदिवसाचा सोहळा न करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 

Ramsheth Thakur_1 &n 
 
 

"मुंबई महापालिकेत विविध अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांमुळे पनवेल महापालिका क्षेत्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने झालेला आपल्याला पाहायला मिळाला. भविष्यात असा प्रकार होऊ नये, यासाठी महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नोकऱ्या देताना त्यांच्या राहण्याच्या व्यवस्थेचा विचार करूनच नोकरी देणे गरजेचे आहे, नाहीतर भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल."
 

 
 
 
मात्र, समाजात गरज लक्षात घेऊन मास्क, रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या, अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, असे आरोग्यदायी उपक्रम संपन्न होऊन नेहमीप्रमाणे समाजाच्या हिताचा वाढदिवस साजरा केला. गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारे दानशूर व्यक्तिमत्त्व आणि सतत माणसांमध्ये रमणारे लोकनेते रामशेठ ठाकूर हे आजच्या कोरोनाच्या अभूतपूर्व संकटकाळातही जनसामान्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र ‘सोशल डिस्टन्स’ नियमांचे पालन करून नागरिकांसाठी आरोग्यदायी उपक्रम पार पडले. ‘सोशल डिस्टन्स’ नियमांचे पालन करून झालेल्या या समाजोपयोगी उपक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला. कोरोना विषाणू प्रादुर्भाव लक्षात घेता, पनवेल परिसरातील किमान ८० हजार नागरिकांना मास्क व रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्या देण्याचा उद्देश ठेवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून तब्बल एक लाख दहा हजार मास्कचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबरीने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या ‘आर्सेनिक अल्बम-३०’ या गोळ्यांच्या एक लाख २० हजार बाटल्यांचे वाटप भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात आले. मास्क व रोगप्रतिकारक औषध भाजपच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकप्रतिनिधींनी आपापल्या प्रभागात व विभागात नागरिकांना वाटप केले. त्याचबरोबरीने अनेक ठिकाणी अन्नधान्यवाटप, भोजनवाटप, फळेवाटप, तसेच स्वच्छता मोहीमही राबविण्यात आली. या उपक्रमांत त्या त्या विभागातील लोकप्रतिनिधींनी सहभाग घेऊन उपक्रम यशस्वी केले.
 
कोरोना महामारीच्या काळात अनेक रुग्णालयांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. रक्ताची ही तूट भरून काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या माध्यमातून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल, नवीन पनवेल, कर्जत, उरण, खारघर, सुकापूर, उरण आदी ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. रक्तदात्यांनी रक्तदान करून या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पनवेल महापालिका क्षेत्रात ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’ २५ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. कोरोना व्हायरस आणि त्यामुळे असलेल्या ‘लॉकडाऊन’ परिस्थितीत गरीब नागरिकांवर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि भाजपच्या वतीने खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणीही मोफत अन्नछत्र सुरू करण्यात आली. पनवेल शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मुनोथ इम्प्रेस सोसायटीजवळ ‘मोदी भोजन कम्युनिटी किचन’च्या माध्यमातून दररोज दुपारी १२ ते दुपारी १ वाजेपर्यंत ३०० गरीब गरजू नागरिकांना मोफत जेवण दिले जात आहे. ‘लॉकडाऊन’ संपेपर्यंत हा उपक्रम चालूच राहणार आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविला जात असून खारघर, कामोठे, पनवेल या ठिकाणी ही ‘कम्युनिटी किचन’ सुरू करण्यात आली. त्यांच्या या कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते त्यांचा ‘कोरोना देवदूत’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
- नितीन देशमुख
Powered By Sangraha 9.0