जमील शेख हत्येचा मास्टरमाईंड राबोडीतच

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Dec-2020
Total Views |
mns_1  H x W: 0





मूक धरणे आंदोलनात मनसेचा आरोप



ठाणे: ठाण्यातील मनसेचे विभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड हा राबोडीतीलच असून त्याला तात्काळ अटक करा.अशी मागणी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केली आहे.ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी मनसेच्यावतीने "मूक धरणे" आंदोलन करण्यांत आले.यावेळी मनसेचे पदाधिकारी तसेच राबोडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


काही दिवसांपूर्वी राबोडी परिसरात भरदुपारी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जमील शेख याच्या डोक्यात गोळी झाडली होती. घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे शाहीद शेख या आरोपीला पकडण्यात आले असले तरी हत्येचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

या पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने मंगळवारी दि. १ डिसेंबर रोजी (आज) मूक धरणे आंदोलन करण्यात आले. "जमील शेख यांची हत्या, क्लस्टर विरोधातून झाल्याचा संशय व्यक्त करून ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी व या हत्येचे षडयंत्र राबोडीमध्येच रचले असून मुख्य सूत्रधारही (मास्टरमाईंड) राबोडीतीलच आहे" असा आरोप यावेळी मनसेने केला आहे.
@@AUTHORINFO_V1@@