'बाटा'च्या आंतरराष्ट्रीय सीईओपदी भारतीय संदीप कटारिया

01 Dec 2020 13:23:54

BATA_1  H x W:
 
नवी दिल्ली : 'बाटा' कंपनीच्या १२६ वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मुख्य कार्यकारी अधिकारी पदी एका भारतीयाची निवड झाली आहे. संदीप कटारिया यांची बाटाच्या आंतरराष्ट्रीय सीईओ पदी निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी बाटा इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद सांभाळले होते. बाटाचे माजी ग्लोबल सीईओ एलेक्सिस नसार्ड यांची जागा ते घेणार आहेत.
 
 
जाणून घ्या कोण आहेत संदीप कटारिया ?
 
संदीप कटारिया यांनी आयआयटी दिल्लीमधून आपले अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले. तसेच ते, झेविअर स्कूल ऑफ मॅनेजमेंटचे १९९३च्या व्यवसाय व्यवस्थापन पदव्युत्तर पदविकेचे सुवर पदक विजेते आहेत. बाटामध्ये काम करण्याआधी त्यांनी युनिलिव्हर, यम ब्रॅण्डस आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांमध्ये २४ वर्ष काम केले आहे. २०१७ मध्ये संदीप कटारिया बाटा इंडियामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू झाले होते. स्वित्झर्लंडमध्ये मुख्यालय असलेल्या बाटासाठी भारत एक मोठी बाजारपेठ आहे. कटरिया यांच्या नेतृत्वाखाली बाटा इंडियाने दुप्पट नफा कमावला. बाटाने प्रामुख्याने तरुण ग्राहकांवर आपले लक्ष केंद्रीत केले. २०१९-२० मध्ये बाटा इंडियाचा महसूल ३,०५३ कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट ३२७ कोटी रुपये होते.
 
Powered By Sangraha 9.0