ठाण्यातील मामलेदार मिसळचे लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन

01 Dec 2020 15:53:57

misal_1  H x W:




मिसळच्या दर्जामध्ये तडजोड न करता खवय्यांची अनेक वर्षे केली सेवा



ठाणे: आज (दि. १डिसेंबर) रोजी ठाण्यातील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर १९५२ साली मामलेदार मिसळ हे हॉटेल सुरु केले होते. त्यांच्या पश्चात लक्ष्मणशेठ यांनी नरसिंह मुर्डेश्वर यांची परंपरा अखंडीत सुरु ठेवली.

ठाणे शहारात गेली अनेक वर्षे ते मिसळच्या दर्जामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड न करता खवय्यांची सेवा करीत होते. ठाणेकरांसह इतरही शहरांमधील खवय्ये मंडळी खास मामलेदार मिसळ खाण्यासाठी येत असत. ह्या झणझणीत मिसळची चव ठाणे शहराची ओळखच झाली होती.

मागील आठवड्यामध्ये लक्ष्मणशेठ मुर्डेश्वर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर ठाण्यातील कौशल्य रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. सोमवारपर्यंत ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा, सून आणि नातंवडे असा परिवार आहे.

Powered By Sangraha 9.0