"एकीकडे महिलांवर आघात, दुसरीकडे मातोंडकर प्रवेशाच्या बोगस चर्चा"

01 Dec 2020 11:03:12

Nilesh Rane_1  
मुंबई : अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी केली. यानंतर शिवसेनेवर भाजपकडून टीका करण्यात आली. तर दुसरीकडे यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्यावर दिवसाढवळ्या हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. या सर्व प्रकरणावर भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे.
 
 
 
 
 
 
"महाराष्ट्र राज्यात कायद्याचा धाकच राहिलेला नाही. राज्यात महिलांवर दिवसाढवळ्या वार, बलात्कार, अॅसिड फेकण्याचे प्रकार रोज वाढत चालले आहेत, तर दुसरीकडे उर्मिला मातोंडकर शिवसेनेत कधी प्रवेश करणार? यावर बोगस चर्चा जास्त आहे." अशी टीका करत त्यांनी शिवसेना तसेच उर्मिला मातोंडकर प्रवेशावर टीका केली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0