जळगाव : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना दि. ६ नोव्हेंबर २०२० रोजी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या प्रकारावरून त्यांनी आता माफी मागितली आहे. “सभेमध्ये मी जे बोललो, त्याचा विपर्यास केला गेला. ब्राह्मण समाजासह अन्य सर्वच समाजांचा मी माझ्या राजकीय आयुष्यात नेहमीच आदर केला आहे. झालेल्या विपर्यासामुळे ब्राह्मण समाजातील बांधवांच्या भावनांना जर ठेच पोहचली असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो.”, असे ट्विट करत खडसे यांनी माफी मागितली आहे.