फराळाला कोरोनाचा फटका : परदेशातील मागणीत घट

09 Nov 2020 19:09:14
faral_1  H x W:

 
 


डोंबिवली : दिवाळीत घरगुती फराळाच्या पदार्थाची चव चाखता यावी याकरिता त्याला परदेशातून मोठय़ा प्रमाणात मागणी असते. पण यंदा कोरोनाच्या भितीने त्यांची मागणी ५० टक्क्यांनी घटली असल्याचे फराळ विक्रेता सुनील शेवडे यांनी सांगितले. डोंबिवलीतील काही फराळ विक्रेत्याकडून परदेशात फराळ पाठविला जातो. आईच्या हाताची चव मुलांना मिळावी या उद्देशाने ही संकल्पना राबविण्यात येऊ लागली. काही जण फराळ विक्रेत्यांकडून ही फराळ घेऊन तो आपल्या मुलांना किंवा नातेवाईकांना पाठवित असतात. पण त्यांचे प्रमाण फारच कमी आहे. शिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त मुले अनेकदा परदेशात वास्तव्याला असतात. त्यांना दिवाळीत आईच्या हाताचा फराळ चाखता यावे म्हणून कुरियरने हा फराळ त्यांच्यार्पयत पोहोचविला जातो. १७६ देशात या माध्यमातून फराळ पाठविला जातो. त्यात फॅमिली हॅम्पर पॅक आणि स्टुडंट हॅम्पर पॅक असे दोन भाग केले आहेत.
 
 
 
कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. बेकारीचे प्रमाण वाढले. त्यामुळे अनेकांनी दिवाळीचा फराळ घरगुती बनवून विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे फराळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर ही परिणाम झाला आहे. या विक्रेत्यांचा व्यवसाय ५० टक्क्यांनी घटला आहे. यंदाच्या वर्षी फराळ विक्रेत्यांनी नेहमीचेच फराळाचे पदार्थ बनविले आहेत. दरवर्षी हे विक्रेते एखाद्या पदार्थात नावीण्य आणण्याचा प्रयत्न करीत असतात. पण यंदा रेग्युलर फराळ विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. यंदाच्या फराळाच्या किंमतीत कोणतीच वाढ करण्यात आली नाही. फराळ बनविण्यासाठी लागणा:या पदार्थाच्या किंमतीत वाढ झाली असली तरी विक्रेत्यांनी फराळाच्या किंमती वाढविलेल्या नाहीत. ग्राहकांची यंदा खरेदीची क्षमता कमी असल्याने त्यांनी नफा कमी ठेवून फराळाची विक्री करत आहेत.
 
 
 
फराळचे यंदाचे दर किलोमध्ये चकली - ४०० रू. कडबोळी- ४०० रू. ,तिखट शेव- ३०० रू., लसूण शेव- ३०० रू., पातळ पोहा चिवडा - ३००, फुलवलेला पोहा चिवडा- ३०० रू. , ज्वारी पोहा चिवडा- ३५० रू. , कोथिंबीर चिवडा-३५० रू. , बेक्ड शंकरपाळे- ३६० रूपये,अनारसे- १८० रू. ला १० नग, कानवले- २५० रूपयांला १० नग , चिरोटे- १ पॉकीट- १२० रू. ला आहे.





Powered By Sangraha 9.0