एस.टी. कर्मचाऱ्याची आत्महत्या ; कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन

09 Nov 2020 12:15:25

ST Employee_1  
 
मुंबई : महाराष्ट्रातील एस. टी. कर्मचाऱ्यांना गेल्या तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. दिवाळीसारखा महत्त्वाचा उत्सव तोंडावर असताना घरी पगारच येत नसल्याने कर्मचाऱ्यांवर रस्त्यावर यायची वेळ आली आहे. अशामध्ये रत्नागिरी एसटी डेपोतील चालक पांडुरंग गडदे यांची आत्महत्येची बातमी कळताच सर्व एस. टी. कर्मचाऱ्यांनी आक्रोश आंदोलनला सुरुवात केली. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करा, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्याकडून केली जात आहे. तसेच, प्रलंबित वेतनासाठी ९ नोव्हेंबरला प्रत्येक एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबासोबत स्वतःच्या घराबाहेर आक्रोश आंदोलन करत आहे.
 
 
तसेच, जळगावच्या रायपुर कुसुंबा गावामध्येही मनोज चौधरी या एस. टी. कर्मचाऱ्याने आत्महत्या केली. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये एस. टी. महामंडळ आणि ठाकरे सरकारचा उल्लेखही केला गेला असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. दिवाळीपर्यंत कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन अदा करावे. तसेच एसटी महामंडळाला तातडीने दोन हजार कोटींची मदत करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0