अखेर रोहित शर्माचा भारतीय संघात समावेश, पण...

    दिनांक  09-Nov-2020 17:29:36
|
 
kriket_1  H x W
 
 
 
 
मुंबई : बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आणि अनेक वादांमध्ये सापडली. सलग ३ वर्षे आयपीएल स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमारचा अंतिम संघात समावेश केला गेला नाही. तर, दुसरीकडे रोहित शर्माला दुखापतग्रस्त म्हणून जाहीर करून त्यालाही संघाबाहेर ठेवण्यात आले. त्यानंतर बीसीसीआयने राजकारण केल्याचा आरोप सोशल मिडियावर करण्यात आला. मात्र, आता पुन्हा एकदा संघामध्ये काही बदल करून रोहित शर्माचा समावेश करण्यात आला आहे. तसेच, वरून चक्रवर्तीला दुखापतीमुळे बाहेर राहावे लागणार आहे.
 
 
 
 
नुकतेच नव्याने जाहीर केलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत माहितीनुसार, रोहित शर्माचा भारतीय कसोटी संघामध्ये समावेश करण्यात आला असून एकदिवसीय आणि टी - २०मध्ये विश्रांती देण्यात आली आहे. यादरम्यान त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेउनच त्याला अंतिम ११मध्ये खेळवायचा कि नाही हे ठरवले जाणार आहे. तसेच, हैदराबाद संघाचा यॉर्करकिंग टी. नटराजन याचादेखील संघात समवेश करण्यात आला आहे. तसेच, कर्णधार विराट कोहली हा पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पत्नी अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.