आयपीएल सट्टेबाजी प्रकरणात माजी क्रिकेटपटूला अटक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Nov-2020
Total Views |

IPL_1  H x W: 0
 
मुंबई : यंदाचे आयपीएल २०२० हे दुबईमध्ये खेळवला जात आहे. अंतर, तरीही अद्याप मुंबईतील सत्तेबाजीवर आळा घालणे अवघड झाले आहे. वर्सोवा पोलिसांनी घातलेल्या एका धाडीमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या काही आरोपींना पकडण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरीसयांचादेखील समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
 
 
 
मुंबईचा माजी क्रिकेटपटू रॉबिन मॉरिसवर पोलिसांनी कारवाई केली आहे. मॉरिस याने १९९५ ते २००७ या कालावधीमध्ये ४४ प्रथम श्रेणी आणि ५१ लिस्ट ए मॅच खेळल्या होत्या. वर्सोव्यात आयपीएल मॅचवर सट्टेबाजी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी मॉरिसच्या घरातून फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. मॉरिसला न्यायालयात हजर करण्याआधी पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. मॉरिसला आयपीएल बेटिंगच्या आरोपावरुन अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
 
@@AUTHORINFO_V1@@