अलका कुबल - प्राजक्ता गायकवाड वाद आता उदयनराजेंकडे

    दिनांक  09-Nov-2020 11:34:59
|

Alaka Kubal_1  
सातारा : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांचा वादअद्यापही संपलेला नाही. अभिनेत्री आणि 'आई माझी काळूबाई' मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडवर काही आरोप केलेले. यानंतर त्यांच्या आरोपाचे खंडन करताना प्राजक्ताने पत्रकारपरिषद घेत सहकलाकाराने तिला शिवीगाळ करत निर्मात्यांनी त्याला पाठीशी घातल्याचा आरोप केला होता. याबाबत आता अभिनेत्री अलका कुबल यांनी खासदार उदयनराजेंची भेट घेतली आहे. याबाबत स्वतः अलका कुबल यांनी साताऱ्यात येऊन त्यांची भेट घेतली.
 
 
 
 
यावर उदयनराजेंनी ट्विट करून "जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांनी आज भेट घेतली. काही दिवसांपासून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासोबत काही विषयांवर झालेल्या वादाबद्दल चर्चा झाली. यावेळी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्याशी देखील चर्चा केली. हा वाद लवकरच मिटवून पुन्हा एकत्र येऊन काम करावे ही इच्छा आम्ही व्यक्त केली." अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता तरी हा वाद मिटतो का हे पाहावे लागेल.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.