मराठा मोर्चा मातोश्रीकडे, सरकारची दडपशाही : विनायक मेटे

07 Nov 2020 11:28:30

Maratha_1  H x
 
मुंबई : आरक्षणावरून पुन्हा एकदा मराठा समाज आक्रमक झाला असून शनिवारी हा मोर्चा थेट मातोश्रीवर घेऊन जाण्याचा निर्धार केला आहे. मात्र, याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी नाकारून रडीचा डाव खेळत असल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. तसेच, हा मोर्चा सुरक्षेचे कारण पुढे करत हे सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करत आहे, असेदेखील ते म्हणाले. तसेच, पंढरपूरमध्ये संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. 
 
 
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून शनिवारी संध्याकाळी मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तवर या मोर्चाला मातोश्रीवर जाण्यास मज्जाव करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यावर विनायक मेटे यांनी सांगितले की, "बाळासाहेब ठाकरेंच्या काळात नागरिक मातोश्रीवर गाऱ्हाणे घेऊन जात होते. मात्र, आज मुख्यमंत्री मातोश्रीवर कोणी येऊ नये म्हणून बंदोबस्त करत आहेत. सरकारकडून मराठा मोर्चेकऱ्यांना नोटीस पाठवण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. मुंबई तसेच पंढरपूरमध्ये मराठा नेत्यांवर पारख ठेवली जात आहे." असे आरोप केले आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0