कर्नाटकात लव जिहादविरोधी कायदा येणार

07 Nov 2020 12:47:05

karnataka_1  H
 
कर्नाटक : उत्तर प्रदेशनंतर आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनीदेखील राज्यात लव जिहादच्या संबंधातील घटना रोखण्यासाठी कायदा करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. यानंतर आता उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा पाठोपाठ लव जिहाद विरोधात कायदा करणारे कर्नाटक चौथे भाजपशासित राज्य ठरणार आहे.
 
 
 
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले की, " लव जिहाद विरोधी कायद्यासंबंधी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आधीच चर्चा करण्यात आली आहे. येत्या दोन-तीन दिवसात याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या रांज्याविषयी ते काय करत आहेत मला माहित नाही. मात्र, कर्नाटकात आम्ही लव जिहाद संपवणार आहोत. लव जिहाद प्रकरणात कर्नाटक सरकार लवकरात लवकर निर्णय घेण्याचा प्रयत्न करेल."
 
 
 
Powered By Sangraha 9.0