डेमोक्रेट्सला २२४ रिपब्लिकन्सला २१३ मते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-Nov-2020
Total Views |
US Election_1  



वॉशिंग्टन : अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूकीची मतमोजणी सुरू आहे. न्यूयॉर्क टाइम्सनुसार, सुरुवातीच्या आकडेवारीत बायडन यांना २२४ तर ट्रम्प यांना २१३ इलेक्टर मते मिळाली आहेत. फ्लोरीडा येथे ट्रम्प यांना विजय मिळाला आहे. स्विंग टेस्टमध्ये जो जिंकतो तोच व्हाईट हाऊसमध्ये पाऊल ठेवतो, असा इथला शंभर वर्षांचा इतिहास आहे. आयोवामध्ये बाईडेन पुढे आहेत.
 
 
बिडेन यांनी जनतेला संबोधित केले आहे. आता जिथे मी आहे तिथे खुश आहे, असे ते म्हणाले आहेत. विस्कॉन्सिन आणि मिशिगन या ठिकाणाहून मिळालेल्या माहितीमुळे समाधानी आहे. जोपर्यंत बॅलेट मोजणी पूर्ण होऊ शकत नाहीत. तोपर्यंत निवडणूक संपत नाही, असेही ते म्हणतात.
 
ट्रम्प यांनी ट्विट केले असून आपण एका उंचीवर जात आहोत, असे म्हटले आहे. न्यूयॉर्क टाईम्सनुसार, सीनेटमध्ये आतापर्यंत डेमोक्रेट्सला ३४ आणि रिपब्लिकनला ४४ जागा मिळाल्या आहेत. हाउस ऑफ रिप्रेझेंटेटीव्हसमध्ये डेमोक्रेट्सला ११८ तर रिपब्लिकन्सला १४० जागा मिळाल्या आहेत.




@@AUTHORINFO_V1@@