ब्रेकिंग ! ५ नोव्हेंबरपासून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरु होणार

04 Nov 2020 17:20:21

Cinema halls_1  
 
मुंबई : महाराष्ट्र सरकारने अनलॉक ५ ची नवी नियमावली जाहीर केली आहे. यामध्ये चित्रपटगृह, नाट्यगृह आणि मल्टीप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात असलेल्या स्विमिंग पूल, इनडोअर योगा क्लास, इनडोअर क्रीडा प्रकार सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारने या सर्व गोष्टींना मान्यता दिली असली तरी फेस मास्क, सोशल डिस्टंसिंग सारखे नियम पाळणे अनिवार्य असणार आहे.
 
 
 
 
गेली ८ महिन्यांहून अधिक काळ राज्यातील नाट्यगृह, चित्रपटगृह बंद आहेत. सिनेमागृह, नाट्यगृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सिनेमागृह मालकांकडून करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी सिनेमागृह मालकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सिनेमागृह लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी केली होती. या संदर्भात एसओपी निश्चित झाल्यावर सिनेमागृह सुरू करण्यात येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर आता राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात ५० टक्के क्षमतेने सिनेमागृह, नाट्यगृह सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0