‘अन्नपूर्णा देवीची’ मूर्ती भारतात परत आणू

30 Nov 2020 13:20:06

modi_1  H x W:


‘मन की बात’ मध्ये मोदींचे वक्तव्य
 
मुंबई: अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मुलभूत गरजा आहे. आणि ह्यातली अन्नाची गरज भागवते, त्या अन्नपूर्णा देवीचे भारतीय संस्कृतीतले स्थान अत्यंत महत्वाचे मानले जाते. ह्याच अन्नपूर्णा देवीची मूर्ती तब्बल १०० वर्षांपूर्वी तस्करांनी आंतरराष्ट्रीय सीमा पार करत थेट कॅनडात पोहोचली होती. परंतु अनेक भारतीयांचे श्रद्धास्थान असलेली ही मूर्ती आता भारतात परत आणू असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. ते आपल्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात बोलत होते.
 
 
एका पौराणिक कथेच्या संदर्भानुसार साक्षात भगवान शंकरांनी अन्नपूर्णा देवीचे मंदिर बांधले असे म्हटले जाते. हे मंदिर उत्तरप्रदेश येथील वाराणसी (आताचे बनारस) या शहरामध्ये आहे. भारतात मनोभावे पूजली जाणारी अन्नपूर्णा देवीची मूर्ती अठराव्या शतकातली आहे असे म्हटले जाते. अनंत काळापासून ही मूर्ती रेजिना विद्यापीठातील मॅकेन्झी आर्ट गॅलरीमध्ये ठेवण्यात आली होती.
 
 
ओळख कशी पटली?
‘पीबॉडी एसेक्स’ संग्रहालयात कार्यरत असणाऱ्या एका भारतीय अधिकाऱ्याने मूर्तीच्या हातात खीरीने भरलेलं भांडं आणि त्यात चमचा असल्याचे पाहिले व त्यांच्या लक्षात आलं की सदर मूर्ती अन्नपूर्णा देवीची आहे. आपल्या देशातून अशा पद्धतीने ऐतिहासिक गोष्टींची तस्करी होण्याची ही पहिली वेळ नाही; याआधीही विविध धातूंच्या मूर्ती, पुरातन शिल्प चोरीला जाण्याच्या काही घटना घडल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0