कोणाच्याही बापाला बाप बोलून नारळ फोडत सुटू नका : गणपत गायकवाड

30 Nov 2020 15:36:49

Ganpat Gaikwad1_1 &n
 
 


भाजप काळात मंजूर रस्त्याच्या उद्घाटनासाठी शिवसेना नेत्यांची धावपळ

 
कल्याण : कल्याण पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या एफ केबीन रस्त्याचे सिमेंट कॉक्रीटीकरण करण्यात आल्यावर या रस्त्याचे शिवसेनेकडून घाई गडबडीत केवळ श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन करण्यात आले. शिवसेनेला सडेतोड जबाब देण्यासाठी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी या रस्त्याचे उद्घाटन करुन शिवसेनेवर जहरी टिका करीत कोणाच्याही बापाला बाप बोलून नारळ फोडत सूट नका. लोकांना माहित आहे की, रस्त्यासाठी निधी कोणी मंजूर केला आणि कोणाच्या पाठपुराव्यामुळे काम झाले., असा टोला लगावला.
 
 
 
उद्घाटन प्रसंगी भाजप शहराध्यक्ष संजय मोरे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आमदार गायकवाड यांनी सांगितले की, रस्त्यासाठी आमदार गायकवाड यांनी पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. निधी मंजूर झाल्यावरही महापालिकेडून या कामात दिरंगाई झाली. निवडणूका आल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी साडेसहा हजार कोटी रुपयांची घोषणा करुन दिले नाही अशी टीका करतात. फडणवीस सरकारने चारशे कोटी रुपये महापालिकेला दिले.
 
 
 
 
हा निधी पालिकेला नीट वापरता आला नाही. तर साडेसहा हजार कोटी रुपयांचे यांनी काय केले असते, असा खोचक सवालही आमदार गायकवाड यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. निवडणूका आल्यावर हे जागे झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. साधी पाच हजार रुपये देखील नुकसान भरपाई दिलेली नाही याकडे आमदार गायकवाड यांनी लक्ष वेधले.
 
 
 
एफ केबीन रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रस्ता कामाकरीता एक महिना वाहतूकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महापालिकेने चार कोटी ३५ लाख रुपये खर्च करुन हा रस्ता तयार केला. एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. आज शिवसैनिकांनी रस्त्याचे उद्घाटन केले. यामुळे भाजप आमदार गायकवाड संतप्त होत निवडणूकीसाठी श्रेय घेण्याकरीता शिवसेना उतावीळ झाली आहे याकडे लक्ष वेधले.


Powered By Sangraha 9.0