निकिताच्या मैत्रीणीने दिली साक्ष, धाडस पाहून SIT चकित

03 Nov 2020 14:25:14
Nikita _1  H x
 
 


कुटूंबासह साक्षीदारांना कडक सुरक्षा

 
 
नवी दिल्ली : निकिता तोमर हत्याकांडातील साक्षीदार असलेल्या तिच्या मैत्रीणीने सोमवारी न्यायाधीशांसमोर जबाब नोंदवला. तिचे धाडस पाहून एसआयटीही थक्क झाली आहे. जराही न घाबरता तिने न्यायाधीशांसमोर आपले सविस्तर म्हणणे मांडले. निकिताची मैत्रीण या संपूर्ण हत्याकांडाची साक्षीदार आहे. त्यामुळे तिच्या जबाबावर सुनावणी निर्णायक ठरू शकते.
 
 
 
सीसीटीव्हीत कैद झालेल्या दृश्यांनुसार, निकिताची मैत्रीण घटनेवेळी तिला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, तिच्यासमोर आरोपी गोळीबार केला आणि पसार झाले.पोलीसांनी यामुळेच तिला साक्षीदार बनवण्याची अनुमती दिली होती. मैत्रीणीने दाखवलेल्या धाडसाने एसआयटीही चकीत आहे. तिच्या सुरक्षेचे सर्व जबाबदारी पोलीसांनी घेतली आहे.
 
 
 
निकिताचे खुनी आणि लव्ह जिहादविरोधात लढा
 
सीआरपीसी कलम 164 अंतर्गत हा जबाब महत्वपूर्ण मानला जात आहे. ही साक्ष न्यायाधीशांच्या समोर बंद खोलीत दिली जाते. कुठल्याही दबावाखाली ही साक्ष दिली जात नाही ना याची शहानिशा न्यायमूर्ती करतात. हा जबाब नोंदवल्यानंतर मागे घेतला जाऊ शकत नाही. हा जबाब सीलबंद केला जातो. सुनावणीवेळी न्यायमूर्तींसमोरचा हा उघडला जातो.
 
 
निकिताच्या भावांनाही मिळतेय कडक सुरक्षा
 
फरीदाबादमध्ये रविवारी झालेल्या उपद्रवानंतर निकिताचे भाऊ नवीनला पोलीस आयुक्तांनी शस्त्र परवाना दिला आहे. कुटूंबियांची सुरक्षा वाढवली आहे. प्रत्येकासोबत दोन दोन बंदुकधारी उभे असतील. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर पोलीसांनी पीसीआर व्हॅन उभी केली आहे. रविवारी झालेल्या उपद्रवातील ३२ जणांना अटक झाली आहे. अन्य लोकांचा शोध सुरू आहे.
 
 
पोलीस आयुक्त ओपी सिंह यांनी दोषींना लवकरात लवकर शिक्षआ सुनावणार असल्याची माहिती दिली. तीन दिवसात चार्जशीट दाखल करण्यात आली. पोलीसांकडे ठोस पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे आरोपींवर कारवाई अटळ आहे. रविवारी महापंचायतीत झालेल्या प्रकारावरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ३२ जणांना अटक केली आहे. त्यापैकी तीन जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग अडवणे, दुकानांची तोडफोड करणे, दगडफेक करणे, वाहनांचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे रविवारी या भागात घडले. पोलीसांवरही हल्ला झाला. दहा जण जखमी झाले आहेत.



Powered By Sangraha 9.0