‘मुस्लीम ब्रदरहूड’चे वास्तव

03 Nov 2020 21:06:13

muslims_1  H x
 
 
आखाती देशांत बहुसंख्य मुस्लीम बांधव कामाला जातात. कित्येक मुस्लिमांना असे वाटते (मुस्लीम बांधवांशी चर्चां करून हे विधान करत आहे) की मुस्लीम देशात कामाला गेल्यावर तिथे सुख-समाधान मिळेल. कारण, शरियत कायदा आहे. मुस्लीम राष्ट्र आहे आणि आम्हीही मुस्लीम आहोत. पण, तिथे गेल्यावर कळते की, तिथे यांना भारतीय मुस्लीम म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. कारण, तेथील मुसलमानांच्या मते, भारतीय मुस्लीम हे मूळ मुस्लीम नसून ते इतर धर्मातून आलेले आहेत.
 
 
 
मूर्तिपूजा न मानणारे भूत म्हणजे पुतळाबितळा, या संकल्पना त्याज्य मानणार्या मुस्लीम बांधवांनी कागदावर रेखाटलेल्या विवास्पद चित्राला मात्र खरे मानले. त्या विवादास्पद कार्टूनविरोधात सगळे मुस्लीम विश्व एक झाले असे चित्र दिसले. अर्थात, सूक्ष्मपणे चिंतन केले तर जाणवते की, हे वरवरचे वास्तव आहे. जगभरात मुस्लीम देश या विवादात एकजूट दाखवत असले तरी त्यांचे अंतर्गत संबंध हे या एकजुटीला आतून पोखरतच आहेत. मुस्लीम धर्मीय देश वगैरे मर्यादा न मानता, केवळ ‘मुस्लीम ब्रदरहूड’ मानतात, असेही विधान सर्वमान्य आहे. पण, आज जगभराचा समाचार घेतला तर जाणवते की, ‘मुस्लीम ब्रदरहूड’ हे त्या त्या देशाच्या भौतिक परिस्थितीनुसार स्वार्थ साधण्यासाठी वापरली जाणारी संकल्पना आहे.
 
 
‘मुस्लीम ब्रदरहूड जगभरात तिथेच फोफावली, जिथे या संकल्पनेच्या परिणामावर विचार केला गेला नाही किंवा विपरीत/अनुकूल परिणाम समोर आला असतानाही, त्यावर योग्य निर्बंध, कारवाई होऊ शकली नाही. स्वातंत्र्य, समता आणि मानवतावादाचे आपणच कट्टर पुरस्कर्ते, हे दाखवण्याच्या नादात युरोपिय राष्ट्रे जगभरच्या निर्वासित मुस्लिमांचे अड्डे बनले. या निर्वासितांना हक्काचे नागरिकत्व मिळाल्यावर मात्र त्यांनी इथे हक्क गाजवायला सुरुवात केली. पण, युरोपियन राष्ट्रांना हे समजेपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचा विचार करता तिथे ११ सप्टेंबर २०११ नंतर दहशतवाद्यांना वाकडी नजर टाकण्याची हिंमत का झाली नाही? श्रीलंका छोटासा देश, ‘मुस्लीम बद्ररहूड’ म्हणत, तिथे का नाही आंदोलने सुरू झाली? कारण, गेल्या वर्षी श्रीलंकेने दहशतवादाविरोधात केलेली खंबीर कारवाई.
 
चीनमध्येही मुस्लीम आहेतच, पण तिथेही फ्रान्सविरोधात लोक चाकू वगैरे घेऊन बिगरमुस्लिमांचे खून करायला बाहेर पडले नाहीत. दूरचे कशाला, आपल्या देशात उत्तर प्रदेशमध्ये आंदोलन करण्याची हिंमत झाली नाही. कारण, आंदोलन करू इच्छिणार्यांना माहिती होते की, परिणाम भोगावे लागतील. थोडक्यात, जिथे एकवटल्यावर विरोध होणार नाही आणि झालाच तरी त्या विरोधालाही विरोध करण्याची ताकद असेल तिथेच ‘मुस्लीम ब्रदरहूड’ रंगतो. दुसरे असे की, फ्रान्सच्या विवादास्पद व्यंगचित्राचा हल्लकल्लोळ ताजा असताना कालपरवाच चीनमध्ये चायना सेंट्रल टेलिव्हिजनवर मोहम्मद पैंगबरांचे चित्र दाखवले गेले. मग चीनच्या विरोधात का बरं कुणी एकवटलं नाही? सगळे मुस्लीम धर्माच्याखातर एक आहेत, असेही एक चित्र रंगवले गेले. मात्र, अफगाणिस्तानमध्ये काल-परवाच विश्वविद्यालयावर हल्ला केला गेला, त्यात १९ विद्यार्थी नाहक मारले गेले, शिया-सुन्नीही वादात दररोज तिथे रक्तपात होत आहे. इराण-इराकचेही वास्तव हेच आहे. शिया, सुन्नी, अहमदिया, तबलिगी आणि इतर कितीतरी भागात मुस्लीम समाज वाटला गेलेला आहे. १९६० साली गौस अन्सारी याने ‘मुस्लीम सोशल डिव्हीजन इन इंडिया’ या पुस्तकात मुसलमानांची जातीव्यवस्था याबद्दल अभ्यासाअंती लिहिले आहे की, भारतात मुसलमानांचे चार प्रकारात विभाजन आहे
 
१. अशराफ- जे मुस्लीम अफगाण, अरब, पर्शिया, तुर्क येथून भारतात आले. २. भारतातील उच्चवर्णीय जातीतून धर्मांतर केलेले मुस्लीम. ३. अजलफ ड्ढ मूळ हिंदू समाजातील बारा बलुतेदार जातींमधून धर्मांतर केलेले मुस्लीम. ४. अरजाल- दलित समाजातून धर्मांतरित झालेले मुस्लीम.
 
गौस अन्सारींनी केलेली ही विभागणी आपणही पाहू शकतो, सय्यद कधीही कुरेशींशी आणि खान कधीही अन्सारीशी बेटी व्यव्हार करत नाहीत. आखाती देशांत बहुसंख्य मुस्लीम बांधव कामाला जातात. कित्येक मुस्लिमांना असे वाटते (मुस्लीम बांधवांशी चर्चां करून हे विधान करत आहे) की मुस्लीम देशात कामाला गेल्यावर तिथे सुख-समाधान मिळेल. कारण, शरियत कायदा आहे. मुस्लीम राष्ट्र आहे आणि आम्हीही मुस्लीम आहोत. पण, तिथे गेल्यावर कळते की, तिथे यांना भारतीय मुस्लीम म्हणून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. कारण, तेथील मुसलमानांच्या मते, भारतीय मुस्लीम हे मूळ मुस्लीम नसून ते इतर धर्मातून आलेले आहेत. त्यामुळे या मुसलमानांना ‘मुस्लीम बद्ररहूड’ वगैरेऐवजी शोषणालाच सामोरे जावे लागते. आता या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतल्यावर मग प्रश्न पडतो की, या असल्या ‘मुस्लीम ब्रदरहूड’बाबत काय म्हणावे?
 
 
Powered By Sangraha 9.0