काय चाललंय श्री छत्रपतींच्या महाराष्ट्रात?

26 Nov 2020 17:27:41


chitra wagh_1  

          

  चित्रा वाघ यांचा ट्वीटद्वारे मुख्यमंत्र्यांना थेट सवाल.


मुंबई: “महिला सक्षमीकरणाची भाषणं देणारे पक्ष सत्तेत आल्यानंतर महिला सुरक्षेचा विषय आता महत्वाचा राहिला नाही का?” अशा परखड शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला आहे. ‘मुख्यमंत्री महोदय काय चाललंय श्री छत्रपतींच्या राज्यात’ असं म्हणत चित्रा वाघ यांनी नागपूर, मुंबई आणि भिंवंडी येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनांच्या वृत्तांचे फोटो शेअर केले आहेत.

 
 
 
 
 महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रश्नासंदर्भात कायम आवाज उठवणाऱ्या व त्यावर परखड भाष्य करणाऱ्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राज्यातली विदारक परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिली. नागपूर, मुंबई आणि भिवंडी येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनांमधील पिडीत मुली ह्या अल्पवयीन आहेत. ह्या माँ जिजाऊ, सावित्रीमाईंच्या लेकीबाळी असणाऱ्या कोवळ्या जीवांच्या अब्रूचे लचके तोडले जात आहेत आणि ह्या सर्व बाबींवर ठोस पावलं उचलणं फार आवश्यक आहे.
 
 

यापूर्वी एकदा पत्रकारांशी बोलताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी महिलांच्या संरक्षणासाठी कायदा अस्तित्वात आणू असं म्हटल होतं. आंध्रप्रदेश मध्ये लागू केलेल्या दिशा कायद्याच्या धरतीवर आवश्यक ते बदल करून लवकरच महाराष्ट्रातसुद्धा असा कायदा प्रभावीपणे अमलात आणणे नितांत आवश्यक आहे. नाहीतर यापुढे जन्माला येणाऱ्या चिमुकल्यांचे भविष्य आणखी भयंकर असेल ह्यात शंका नाही.

Powered By Sangraha 9.0