WhatsApp अलर्ट : 'कोविड फंड'च्या नावे होतेय फसवणूक

26 Nov 2020 14:44:08

WHATSAPP_1  H x
 

नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपवर गेल्या काही दिवसांत एक बनावट संदेश (Fake Message) व्हायरल होत आहे. ज्यात केंद्र सरकार कोरोना फंड देत असल्याची अफवा पसरवली जात आहे. १८ वर्षावरील व्यक्तींना केंद्रातर्फे दीड लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याचा फेक मेसेज व्हायरल केला दात आहे. त्यात व्यक्तीला त्याची माहिती भरून देण्याची मागणी केली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलर्ट जाहीर केला आहे. अशा कुठल्याही मेसेजच्या लिंक किंवा मेसेज ओपन करू नका, असे आवाहन केंद्रातर्फे करण्यात आले आहे.
 
 
 
सरकारतर्फे पीआयबी फॅक्ट चेकतर्फे ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. पीआयबीच्या पोस्टनुसार, केंद्र सरकारतर्फे असा कोणताही कोविड फंड जाहीर करण्यात आलेला नाही. अशा प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये. चुकूनही असे मेसेज फॉर्वर्ड करू नये, तसे केल्यास किंवा ही लिंक ओपन केल्यास तुमचा मोबाईल हॅक होऊ शकतो किंवा तुमच्या फोनची डाटाचोरी होऊ शकतो. तसेच हॅकर तुमच्या बँक खात्यावरही डल्ला मारू शकतात.
 
 
 
केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की WhatsApp वर शेअर केला जाणाऱ्या या चुकीच्या मेसेजला बळी पडू नका. बँक खाते किंवा अन्य आर्थिक माहिती व पैशांच्या चोरीसाठी अशा प्रकारच्या लिंक फॉरवर्ड केल्या जात आहेत. तसेच या लिंक ओपन केल्यास तुमच्या मोबाईलमधील माहिती चोरी होऊ शकते. युपीआय किंवा सोशल मीडिया अकाऊंटसचा पासवर्डही चोरी केला जाऊ शकतो.
Powered By Sangraha 9.0