निकोबार बेटावरील मोबाईल ऑटोनॉमस लाँचरच्या मदतीने केलेली ब्राह्मोसची चाचणी यशस्वी
मुंबई: भारताने ‘ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ काल (मंगळवार दि. २४ नोव्हेंबर) क्षेपणास्त्राच्या लँड अटॅक आवृत्तीची निकोबार बेटावरून चाचणी केली. सकाळी १० वाजता घेण्यात आलेल्या या चाचणीत दुसर्या् बेटावरील उद्दीष्ट यशस्वीपणे नष्ट करण्यात आले. डीआरडीओकडून विकसित झालेल्या या क्षेपणास्त्राची भारतीय सैन्याने घेतली. ब्राह्मोस क्षेपणास्त्राची स्ट्राइक रेंज आता ४०० कि.मी.च्या पुढे गेली आहे.
ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्र आपल्या श्रेणीत जगातील सर्वात वेगवान कार्यरत यंत्रणा आहे. गेल्या दोन महिन्यांत डीआरडीओने अनेक शौर्य क्षेपणास्त्र यंत्रणांची चाचणी करण्यात यश मिळविले आहे. त्यामध्ये अनेक नवीन आणि अद्तायावत क्षेपणास्त्र यंत्रणा आहेत. ज्यामध्ये ८०० कि.मी. पेक्षा जास्त अंतरावर अचूक लक्ष्यभेद करू शकणाऱ्या यंत्रणांचासुद्धा समावेश आहे. गेल्या महिन्यात भारतीय नौदलाने आपल्या युद्धनौका आयएनएस चेन्नई येथून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी केली होती, ज्याने ४०० कि.मी. अंतरावर लक्ष्यभेद करण्याची क्षमता दाखवली.
आता भारत देश आपल्या डीआरडीओने पीजे १० या प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणात स्वदेशी बनविलेल्या सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्रासाठी निर्यात बाजार शोधण्याचेही काम करीत आहे. भविष्यात ‘ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ’ क्षेपणास्त्र हे तिन्ही सशस्त्र दलाचे एक बलस्थान होईल, असे म्हणायला हरकत नाही.