अयोध्या विमानतळाचे नामकरण 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम'

25 Nov 2020 13:08:35

ayodhya_1  H x




नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीमध्ये मंदिराचे भूमिपूजन झाले. एकीकडे मंदिर निर्माणाच्या कामाला गती मिळत असताना अयोध्येतील विकासकामांना देखील गती मिळते आहे. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने अयोध्येत तयार होणाऱ्या विमानतळाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता अयोध्यातील या विमानतळाचे नाव 'मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम विमानतळ' असे असणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी २४ नोव्हेंबर झालेल्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.



हे विमानतळ उत्तर प्रदेशमधील पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ असणार आहे. या विमानतळाचे काम सुरू असून पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. उत्तर प्रदेशचे सरकार श्रीराम लल्लाची नगरी अयोध्येला जगातील धार्मिक स्थळांमधील एक महत्त्वाचे, अग्रणी स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे असेही म्हंटले आहे . हे विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वरुपात विकसित केले जाणार आहे. बुद्धांच्या जडणघडणीत महत्त्वाचे स्थान असलेल्या कुशीनगर आणि जेवरमध्ये देखील अशाचप्रकारे आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार होत आहे.
Powered By Sangraha 9.0