शिवसेनेच्या सर्व भ्रष्टाचारी नेत्यांची चौकशी करा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

SS_1  H x W: 0
 
 
 


मुंबई : शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीने शोधमोहिम सुरू केली. तसेच या प्रकरणासंदर्भात एकूण १० ठिकाणी शोधमोहिम सुरू केली आहे. त्यांचे पुत्र विहंग सरनाईक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. यावरून राजकीय कलगी तुरा रंगला आहे. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही आता नेहमीप्रमाणे शिवसेनेला लक्ष्य केले आहे.
  
 
निरुपम म्हणाले, "शिवसेना भ्रष्टाचारी आहे. भ्रष्टाचारातून कमावलेली संपत्ती शिवसेनेच्या नेत्यांकडे आहे. हे मला माहित नाही की, सरनाईक यांनी काय काय केले पण, याप्रकरणी राजकारण न होता, प्रताप सरनाईक यांची चौकशी व्हायला हवी' केवळ सरनाईकच नव्हे तर शिवसेनेच्या इतर अनेक नेत्यांनी भ्रष्टाचारातून भरपूर संपत्ती गोळा केली. फक्त राजकीय द्वेशातून या प्रकरणाकडे न पाहता, त्या सर्वांचीही ईडीमार्फत चौकशी व्हावी,' अशी मागणी त्यांनी केली.
  
 
नेमके प्रकरण काय ?
 
मंगळवारी सकाळी आठ वाजता शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्या ठाणे कार्यालय आणि घरात ईडीचे पथक पोहोचले. त्यांनी शोधमोहिम सुरू केली. नाईक पूत्र पूर्वेश आणि विंहग सरनाईक यांच्या घरीही ईडीचे अधिकारी सकाळी आठ वाजता दाखल झाले. या पथकाचा मुंबई आणि ठाण्यातील एकूण १० ठिकाणी शोध सुरू आहे. टॉप ग्रुपचे प्रमोटर्स आणि सदस्यांच्या घरी आणि कार्यालयात ही शोधमोहीम सुरू आहे. सरनाईक सध्या देशाबाहेर आहेत. महत्त्वाचं म्हणजे सरनाईक यांच्याव्यतिरिक्त शिवसेनेचे आणखी काही नेते ईडीच्या रडारवर आहेत, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
@@AUTHORINFO_V1@@