विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

vihang sairnaik _1 &



मुंबई
: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर ईडीने सकाळीच छापेमारी सुरु केली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक व पूर्वेस सरनाईक यांच्या घरावरदेखील ईडीने तपास सुरु केला आहे. याप्रकरणी आता ईडीने पुत्र विहंग सरनाईक याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. सरनाईक यांचे चिरंजीव विहंग आणि पूर्वेश सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावरही छापे मारण्यात आले. तब्बल चार तासांच्या चौकशीनंतर ईडीने अखेर विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं. त्यांना अधिक चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेले जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना जितेंद्र आव्हाडांशी बिनसल्याने प्रताप सरनाईक सेनेत दाखल झाले. त्यानंतर, बांधकाम व्यावसायिक व हॉटेल व्यावसायिक ते आमदार बनलेल्या सरनाईक यांची कारकीर्द वादग्रस्त राहीली आहे. ठाण्यातील बिल्डर सुरज परमार आत्महत्याप्रकरणीही सरनाईक संशयाच्या भोवर्यात सापडले होते.


प्रताप सरनाईक यांच्या घरी, कार्यालयात ईडीचे अधिकारी पोहोचल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. 'मनी लॉण्ड्रिंगसारख्या प्रकरणात शिवसेना पटाईत आहेत. त्यांचे मुखिया यामध्ये अग्रेसर आहेत. त्यामुळे मला याबद्दल कोणतंही आश्चर्य वाटत नाही. मुंबई महापालिकेत माफिया राज असल्याचा आरोप मी आधीही केला आहे. पालिकेतून कंत्राट, भागिदारीतून प्रचंड पैसा येत असतो,' याकडे त्यांनी लक्ष वेधलं.
@@AUTHORINFO_V1@@