ऑस्ट्रलिया दौऱ्याला रोहित मुकणार ; टीम इंडियाला फटका बसणार का?

24 Nov 2020 16:43:59

Rohit Sharma_1  
 
मुंबई : भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आणि त्याचा ऑस्ट्रलिया दौऱ्यासाठी जाणाऱ्या भारतीय संघाचा समावेश यावर सध्या खूप मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. अखेर रोहित शर्मा आणि इशांत शर्मा पहिले दोन कसोटी सामने खेळणार नसल्याची घोषणा केली. यावरून आता रोहित संपूर्ण दोऱ्याला मुकणार आहे का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जात आहे. यापूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पाल्याच्या संगोपनासाठी कसोटी मालिकेतून माघार घेतली. त्यानंतर रोहितच्या अनुपस्थितीचा किती मोठा फटका हा भारतीय संघाला बसणारा हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. परंतु, या बातमीने भारतीय क्रिकेटपटूंची मात्र चांगलीच निराशा झाली आहे.
 
 
 
आयपीएल २०२०मध्ये एका सामन्यादरम्यान रोहित दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर भारतीय संघाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आली. परंतु, यावेळी दुखापतीचे कारण देत रोहितला एकदिवसीय आणि टी - २० सामन्यातून वगळण्यात आले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटरवर रोहित शर्माचा सराव करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. आयपीएलमधील बाद फेरीच्या सामन्यात रोहितने फलंदाजीही केली. अंतिम सामन्यात अर्धशतकी खेळी करत मुंबईला पाचव्यांदा विजेतेपद जिंकून दिले. मात्र, त्याचा भारतीय संघात समावेश न झाल्याने विराट कोहली आणि बीसीसीआयवर टीकेची झोड उठली. आताही रोहितला पहिल्या २ कसोटी सामान्यांना मुकावे लागणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0