'एका महिलेचं ऑफिस उद्ध्वस्त केलं यात कोणती मर्दानगी होती?'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

praveen darekar_1 &n



मुंबई :
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले असून शोधमोहीम सुरु झाली आहे. ईडीने चौकशीसाठी सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतले आहे. यावरून आता शिवसेना नेत्यांनी भाजपवर निशाणा साधण्यास सुरुवात केलीय आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका करताना ' आज प्रताप सरनाईक त्यांच्या घरी नाही आहेत. त्यांची मुले घरी आहेत. हे पाहून त्यांनी जी धाड टाकली ही नामर्दांगी आहे. भाजपने सरळ लढाई करावी. हे शिखंडीसारखे यंत्रणांच्या आडून कारवाई करू नका." अशी टीका केली होती. यालाच प्रत्युत्तर देत भाजप नेते व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली.





दरेकर यांनी ट्विट करत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. दरेकर म्हणतात," प्रताप सरनाईक घरी नसताना ईडीने धाड टाकली,यात कसली मर्दानगी असं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना विचारलं पाहिजे,एक महिला घरी नसताना...सर्व लवाजमा आणि फौजफाटा घेऊन तिचं ऑफिस उद्ध्वस्त केलं, यात कोणती मर्दानगी होती?" असा सवाल उपस्थित करत दरेकर यांनी संजय राऊतांवर टीका केली.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर १० ठिकाणी ईडीची छापेमारी सुरु आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या ठाण्यातील घरीही ईडीने छापे मारले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. सरनाईक यांच्या घरी आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या कारवाईचं भाजपनं समर्थन केलं आहे.मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर धाड टाकताना ईडीने स्थानिक प्रशासनाला या कारवाईचा थोडाही सुगावा लागू दिला नाही. ही कारवाई करण्यासाठी ईडीने पोलिसांची मदत घेण्याऐवजी सीआरपीएफच्या पथकाला खास पुण्याहून बोलावून घेतलं. हे पथक आल्यानंतर ईडीने एकाच वेळी सरनाईक यांच्या दहा ठिकाणांवर धाडी मारून कागदपत्रांची छाननी सुरू केली आहे. ईडीने पूर्ण तयारी करूनच ही कारवाई केल्याने शिवसेनेत एकच खळबळ उडाली आहे.
@@AUTHORINFO_V1@@