'दिल्ली क्राईम' वेब सिरीजची 'एमी'कडून दखल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Nov-2020
Total Views |

Delhi Crime_1  
 
 
 
मुंबई : दिल्लीतील भयानक २०१२ गँग रेप प्रकरणावर आधारित भारतीय वेब सिरीजने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली छाप सोडली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या मालिकेने आंतरराष्ट्रीय टेलीव्हिजन विश्वात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'एमी' पुरस्कार २०२०च्या सर्वोत्कृष्ट नाट्यमय मालिका विभागात विजेतेपद पटकावले. एका भारतीय मालिका / वेब सिरीजला मिळालेला हा सर्वोच्च बहुमान असल्याची भावना मालिकेच्या निर्मात्या आणि कलाकारांनी व्यक्त केली.
 
 
 
या विभागामध्ये ‘बेटर कॉल सोल’, ‘द किलिंग ईव्ह’, ‘द क्राऊन’, ‘स्ट्रेंजर थिंग्ज’ या सारख्या वेब सिरीजमध्ये 'दिल्ली क्राईम' ही सर्वोत्कृष्ट ठरली. 'नेटफ्लिक्स' प्रदर्शित झालेली ही सिरीज नवी दिल्ली येथे झालेल्या '२०१२ गँग रेप' आणि पोलिसांनी यावेळी केलेली कामगिरी यावर आधारित आहे. दिग्दर्शक रिचा मेहता यांनी ‘दिल्ली क्राईम’ची निर्मिती केली होती. अभिनेत्री शेफाली शाह हिने या सीरिजमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. तसेच, रसिका दुग्गल, आदिल हुसेन अशा कलाकारांचाही समावेश आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@