देशात आणखी ४३ चीनी अ‌ॅपवर बंदी

24 Nov 2020 18:56:19

China App_1  H
 
 
 
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेला धोका असलेल्या ४३ मोबाईल अ‌ॅपवर बंदी लागू केली आहे. यामध्ये बहुतांश अली एक्सप्रेस, मँगो टिव्ही असे चिनी अ‌ॅप आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा ६९ए कायद्यान्वये सरकारने अ‌ॅपवर बंदी लागू केली. माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाने ४३ अ‌ॅपवर बंदी लागू झाल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे वापरकर्त्यांना हे अ‌ॅप वापरता येणार नाहीत.
 
 
केंद्रीय गृहमंत्रालय आणि इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटरने अ‌ॅपचा देशाच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल दिला होता. यावरून केंद्रीय मंत्रालयाने अ‌ॅपवर बंदी लागू केली आहे. हे अ‌ॅप देशाचा सार्वभौमपणा आणि ऐक्य व सुरक्षेला बाधा पोहोचविण्यासाठी कार्यरत असल्याचे आढळून आल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २९ जूनला टिकटॉकसह ५९ चिनी अ‌ॅपवर बंदी लागू केली होती. त्यानंतर २ सप्टेंबरला आणखी ११८ अ‌ॅपवर बंदी लागू करण्यात आली होती. केंद्र सरकार सर्व आघाड्यांवर लोकांचे हितसंरक्षण, सार्वभौम आणि देशाचे ऐक्य अबाधित राखण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी शक्य तेवढी पावले उचलण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0