पवार, सोनिया नंतर बाळासाहेब!, ‘पदवीधर’चा जाहीरनामा

23 Nov 2020 14:32:18

Satish Chavan _2 &nb



मविआच्या ‘अधिकृत’ उमेदवाराच्या त्या पोस्टरमुळे शिवसैनिक नाराज


औरंगाबाद : पदवीधरांच्या विकासासाठी आग्रही आणि अग्रणी, असे उमेदवार असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या जाहीरनाम्यामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या या निवडणूकीसाठी प्रचार जोरदार रंगला आहे. मात्र, चव्हाण यांनी केलेल्या एका चुकीमुळे त्यांना मोठा फटका बसू शकतो. जाहिरनाम्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी आणि त्यानंतर हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, या क्रमाने फोटो लावले आहेत.
 
 


प्रखर हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते असलेल्या बाळासाहेबांचा फोटो महाविकास आघाडीचे नेते सोनिया आणि पवारांनंतर लावतात का या गोष्टीला आक्षेप घेतला जात आहे. चव्हाण यांचा हा जाहीरनामा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी या चुकीची माफी मागावी आणि पुन्हा नव्याने हा जाहीरनामा प्रसारीत करावा, अशी मागणी शिवसैनिक करत आहेत. तसेच भाजप समर्थकांनीही यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये महाविकास आघाडीतील नेत्यांची नाराजीही उघड होत आहे.
 

Satish Chavan _1 &nb


चव्हाण यांच्या दुसऱ्या एका पत्रकाचीही चर्चा आहे. या पत्रकातून बाळासाहेबांचा फोटोच गायब आहे. त्यातही आधी पवार, मग सोनिया आणि नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, असा क्रम लावण्यात आला आहे. चव्हाण हे पधवीधरचे उमेदवार असून अभियंताही आहेत. १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूक प्रचारार्थ ही प्रसिद्धी पत्रके, फलक तयार करण्यात आली आहेत.
 
 

Satish Chavan _3 &nb 
Powered By Sangraha 9.0